खान्देश मराठा पाटील मंडळ - कल्याण
Khandesh Maratha Patil Mandal - Kalyan
खान्देश मराठा पाटील मंडळाची स्थापना 9 वर्षांपूर्वी झाली. खान्देशातील बहुसंख्य मराठा समाजाचे लोक नोकरी व कामधंद्यानिमित्त कल्याण व मुंबईत स्थायिक झाली आहेत. बहुसंख्य असूनही त्यांचा एकमेकांशी परिचय नव्हता. म्हणूनच 2012 या वर्षी खान्देशातील सर्व मराठा पाटील समाजाला एका झेंड्याखाली आणण्यासाठी, सुखदुःखात व संकटात धावून जाण्यासाठी मंडळाची स्थापना 23 नोव्हेंबर 2012 रोजी करण्यात आली. 2012 ते आजपर्यंत मंडळाने 1300 कुटुंबांना मंडळाचे आजीव सभासदत्व दिले. जवळपास 200 विभाग प्रमुख आपापल्या विभागात समाजाचे कार्य करीत आहेत.
मुंबईतील उपनगरात शहरप्रमुख व उपशहरप्रमुख मराठा समाजासाठी कार्यरत आहेत. मराठा समाजाचा संघटनात्मक धागा बलवान ठेवण्यासाठी मंडळाचे " संघटक " कार्यरत आहेत. त्याचप्रमाणे खान्देशातील प्रतिष्ठित समाजसेवी ' सल्लागार 'च्या रुपाने मंडळाला वेळोवेळी मार्गदर्शन करीत असतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मंडळाचे संस्थापक व पंचवीस पदाधिकाऱ्यांची कार्यकारिणी समाजाचे नेतृत्व करीत आहे.
मंडळाच्या कामकाजासाठी अतिशय आदर्श व गुणात्मक अशी रचना समाजविकासासाठी केली आहे. कोणत्याही पदाधिकार्याला कोणत्याही प्रकारचे मानधन दिले जात नाही.गेल्या आठ वर्षापासून दरवर्षी मंडळातर्फे
(1) विद्यार्थी गुणगौरव समारंभ
(2) सेवानिवृत्तांचा सत्कार सोहळा
(3) वधूवर मेळावा
(4) कौटुंबिक स्नेहसंमेलन व सांस्कृतिक कार्यक्रम
(5) महिलांसाठी हळदी कुंकू
असे अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविले जातात.
कोरोना संकटकाळात खान्देशातील सर्व जातीधर्माच्या गरजू बांधवांना व झोपडपट्टी वासियांना एक महिना पुरेल एवढे 200 किराणा कीट वितरीत केले.
दरवर्षी समाजासाठी मंडळ 4/5 लाख खर्च करूनही आज जवळपास 30 लाखांचा निधी शिल्लक आहे. मंडळाचा आर्थिक आलेख उंचावणारा आहे. दर्जेदार व भव्य-दिव्य कार्यक्रम करून खान्देशातील मराठा समाजाचे नाव कल्याण नगरी व उपनगरात उच्च शिखरावर नेले.
मंडळाचे एकच मोठे स्वप्न आहे ते म्हणजे " खान्देश मराठा पाटील भवन " निर्मितीचे . मराठा समाजाला शोभेल असेच कार्य मंडळ करीत आहे. महाराष्ट्रातील नोंदणीकृत सामाजिक मंडळाच्या वधू - वर मेळाव्यात कल्याण मंडळ पहिल्या क्रमांकावर आहे याचा समाजाला सार्थ अभिमान वाटतो.
दरवर्षी भव्य-दिव्य वधू-वर मेळावा कल्याण नगरीत घेवून समाजाचे ऋण फेडण्याचे प्रामाणिक काम मंडळ करीत आहे. मंडळाची एक सुंदर व उच्चप्रतीची पुस्तिका दरवर्षी प्रकाशित करतो. समाजबांधवांचे असेच सहकार्य व प्रतिसाद कायम असल्यास ध्येयनिश्चितीस वेळ लागणार नाही. सर्व समाजबांधवांचे कल्याण मंडळाच्या वतीने मनःपूर्वक आभार.
कार्यकारिणी २०१४-२०१९
कार्यकारिणी २०१९-२०२४
शहरप्रमुख व उपशहरप्रमुख
(1) आजीव सभासदत्व कोणाला द्यायचे व कोणाला नाकारायचे याचे सर्व अधिकार मंडळाच्या कार्यकारिणीस आहेत.
(2) खान्देशातील (धुळे, नंदुरबार, जळगांव, नाशिक) मराठा पाटील समाजबांधव 1000 रूपये भरून आजीव सभासदत्वासाठी अर्ज करू शकतात.
(3) आजीव सभासदांनाच मतदानाचे अधिकार असतील.
(4) आजीव सभासदालाच मंडळाच्या निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज भरता येईल.
(5) आजीव सभासदालाच नियमानुसार कार्यकारिणीत घेतले जाईल.
(6) सभासदत्व रद्द करण्याचे सर्व अधिकार मंडळाच्या कार्यकारणीस असतील.